अमेरिकेत काश्मिरी हिंदूंची व्यथा दर्शवणारे प्रदर्शन
हिंदूंनो, काश्मिरी हिंदूंच्या व्यथा सातासमुद्रापलीकडे पोहोचवणार्या इंडो-अमेरिकन काश्मीर फोरमकडून शिका !
24-06-2008
हॉस्टन, २४ जून (प्रे.ट्र.) - इस्लामी दहशतवादाला बळी पडलेल्या काश्मिरी हिंदूंची व्यथा दर्शवणारे एक प्रदर्शन इंडो-अमेरिकन काश्मीर फोरमने जागतिक निर्वासित दिनाच्या निमित्ताने कान्सास येथे २० जूनपासून आयोजित केले आहे.
स्वत:च्याच भूमीत गेली १८ वर्षे काश्मिरी हिंदू निर्वासित जीवन जगत आहेत. इंडो-अमेरिकन काश्मीर फोरमचे अध्यक्ष श्री. ललित कौल यांनी काश्मिरी हिंदूंना इस्लामी दहशतवादाच्या भीतीपोटी काश्मीर सोडून जाणे कसे भाग पाडण्यात आले, हे स्पष्ट केले. निर्वासितांचे जीवन जगणार्या हिंदूंच्या आरोग्यविषयक समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून त्याची इत्थंभूत माहिती श्री. कौल यांनी या वेळी दिली. काश्मिरी हिंदूंवर दहातवाद्यांनी काश्मीरचे खोरे सोडण्यासाठी कशी जबरदस्ती केली, हे श्री. कौल यांनी प्रेक्षकांसमोर मांडले. प्रेक्षकांनी या दहशतवादाच्या विरोधात आवाज उठवावा व निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment