काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत ९ जण ठार
24-07-2008
श्रीनगर, २४ जुलै (वृत्तसंस्था) - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी विविध ठिकाणी केलेल्या हल्ल्यांत ९ जण ठार झाले व २० जण जखमी झाले. शहरातील बाटमलू बसस्थानकावर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेडच्या स्फोटात ५ जण ठार झाले असून १८ जण जखमी झाले.
(दहशतवाद्यांचे नंदनवन बनलेल्या काश्मीरमधील दहशतवाद कायमस्वरूपी निपटून काढण्यासाठी आक्रमक पावले न उचलणारी आतापर्यंतची केंद्रातील व काश्मीरमधील सर्वपक्षीय सरकारे वैचारिक क्रांती अपरिहार्य करतात ! - संपादक) जखमींमध्ये ३ मुलांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनपर्यंत कुठल्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.दोडामध्ये चार जणांची हत्या दोडा जिल्ह्यात हिजबुल मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना सोडलेल्या गुलाम हसन वणी व त्याच्या कुटुंबातील तीन जणांची दहशतवाद्यांनी हत्या केली. आज सकाळी दहशतवादी वणी याच्या घरात घुसले व त्यांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारामध्ये वणी याच्यासह चार जण ठार झाले. ही हत्या हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी केली. हत्या करून हे दहशतवादी पसार झाले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २ सुरक्षा जवान जखमी आज दहशतवाद्यांनी शहरातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यात २ जवान जखमी झाले. नूरबाह परिसरामध्ये असलेल्या या सुरक्षातळावर दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा मारा केला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment