१ जुलै १९४७ रोजी मंजूर झालेल्या इंडियन इंडिपेंडन्स अँक्ट या कायद्यानुसार भारत-पाक फाळणी झाली. २६ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मिरी जनतेच्या संमतीनेच काश्मीरचे भारतात विलिनीकरण झाले.
तेव्हापासूनच पाकिस्तानने भारताला सशस्त्र संघर्षात खेचले. `आयएएस' ही पाकिस्तानची गुप्तहेर संघटना प्रशिक्षित दहशतवादी भारतात सोडणे, मुसलमानी राज्यांतील टोळयांना जिहाद करण्यास भारतात सोडणे अशा कारवाया करत आहे. जम्मू-काश्मीरच्या भूमीवर चार युद्धे होऊनही खरीखुरी शांतता अद्याप नाही; उलट पाकिस्तानने पुकारलेल्या छुप्या युद्धाचा रंग अधिक रक्तरंजित होत आहे व त्याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटले आहेत. अद्याप तो जीवघेणा संघर्ष शमलेला नाही ! त्याचे स्वरूप आता आक्राळ-विक्राळ झाले आहे. गेली कित्येक वर्षे भारतीय सैन्य मात्र रात्रीचा दिवस करून देशाच्या सीमांचे रक्षण करत आहे ! मूळची कश्यप ऋषींची भूमी असलेल्या या काश्मीरमधील लाखो हिंदूंना मुसलमानांनी निर्वासित केले आहे ! त्यांची क्रूर आणि अमानूष हत्याकांडे घडवून, त्यांच्या स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करून काश्मीर हिंदुरहित करण्याचा त्यांचा डाव आहे ! तेथील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करून हिंदु संस्कृती नष्ट करण्याचा चंग बांधला आहे ! निष्क्रीय व मुसलमानांनाचे लांगूलचालन करणारे राज्यकर्ते ना धड सैन्याला काही आदेश देत ना स्वत: काही कृती करत. येथील हिंदूंचे हालहाल होत असतांना राज्यकर्त्यांना मात्र काश्मीरची समस्या तशीच ठेवायची आहे ! हिंदूंनो, संघटित व्हा, अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्यास सरकारला भाग पाडा !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment