भ्रष्टाचारी देशांच्या क्रमवारीत भारत ७४ व्या स्थानावर

भ्रष्टाचारी देशांच्या क्रमवारीत भारत ७४ व्या स्थानावर
26-06-2008

न्यूयॉर्क, २६ जून (प्रे.ट्र.) - `ट्रान्स्फरन्सी इंटरनॅशनल' या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्थेने तयार केलेल्या भ्रष्टाचारी देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत ७४ व्या स्थानावर घसरला आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत भारत दोन अंकांनी खाली गेला आहे. (याला जबाबदार कोण आहे, याचे उत्तर जनतेला माहीत आहे. देशाला अधोगतीच्या खाईत लोटणार्‍यांना सत्तेवरून दूर करण्यासाठी आता क्रांतीला पर्याय नाही ! - संपादक)पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून भ्रष्टाचारी देशांच्या क्रमवारीत तो देश सध्या १४० व्या स्थानावर आहे, तर रशिया १४५ व्या स्थानावर आहे. २००७ मध्ये भारत व चीन ७२व्या क्रमांकावर होते; मात्र या वर्षी भारत दोन अंकांनी खाली घसरल्याने चीनपेक्षा जास्त भ्रष्टाचारी ठरला आहे. डेन्मार्क, फिनलँड, न्यूझिलंड, सिंगापूर व स्वीडन हे देश क्रमवारीत पहिल्या पाच क्रमांकावर असून ते जगातील सर्वांत कमी भ्रष्टाचारी देश ठरले आहेत.

No comments: