धरणाच्या पाण्यात प्रसिद्ध हिंगलाज देवीचे मंदिर जाण्याची भीती

धरणाच्या पाण्यात प्रसिद्ध हिंगलाज देवीचे मंदिर जाण्याची भीती !
08-07-2008

क्वेट्टा(पाकिस्तान), ७ जुलै (वृत्तसंस्था ) - येथील हंगोल नदीवर धरण बांधण्याचा घाट सरकारने घातला आहे. या धरणाच्या निर्मितीमुळे ऐतिहासिक हिंगलाज देवीचे मंदिर पाण्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
या धरणाला पर्यावरणवादीदेखील विरोध करत आहेत. बलुचिस्तान प्रांताचे वीज व पाणीपुरवठा मंत्री सरदार मुहमंद अस्लम बिझेंजो यांनी अनेक प्रांतिक मंत्र्यांसमवेत प्रस्तावित धरणाच्या बांधकामाला विरोध केला असून हे धरण बांधल्यास मंदिर व त्याकडे जाणारे रस्ते पाण्याखाली जातील. देशातून परदेशात मोठ्या प्रमाणावर हिंदू येथे येतात. येथे जत्रादेखील पार पडते. आपण हे मंदिर पाण्याखाली जाऊ दिल्यास पाकिस्तानच्या जागतिक प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होईल, असे त्यांनी पारित केलेल्या ठरावात म्हटले आहे. हिंदुबहुल भारतातील मंदिरे संकटात असतांना त्याविषयी काहीही न करणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते पाकिस्तानमधील मंदिरे संकटात असतांना काही करणार नाहीत, याची खात्री बाळगा !

No comments: